*राज्यातील दोन आयएएस, एक अपर जिल्हाधिकारी नापास; सहा जण काठावर पास*
____निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाधिकारी (डीईओ/जिल्हा निवडणूक अधिकारी) व अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या (निर्णय अधिकारी) घेतलेल्या परीक्षेत दोन जिल्हाधिकारी व एक अपर जिल्हाधिकारी नापास, तर सहा अधिकारी काठावर पास झाले आहेत.पाच बॅचमध्ये झाले होते प्रशिक्षण२८ आयएएस अधिकारी आणि २० अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर दि. ५ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत पाच बॅचमध्ये घेण्यात आले.त्या प्रमाणीकरण शिबिराचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहेwww.konkantoday.com