फाटक हायस्कूलचे शिक्षक संतोष भेलेकर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

रत्नागिरी : शहरातील दि न्यू एज्यूकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलचे सहायक शिक्षक संतोष भेलेकर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मागील 30 वर्षांपासून रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूलमध्ये त्यांचे शैक्षणिक सेवा देण्याचे काम सुरू आहे. गणित विषय अध्यापन, शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, इतर शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमधील कार्याची दखल घेऊन शिक्षक भेलेकर यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार ना. गो. गाणार यांच्यासह शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संतोष भेलेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button