लिडकॉम आपल्या दारी’ अंतर्गत गुरुवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कार्यशाळा*
*’*रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त ‘लिडकॉम आपल्या दारी’ अंतर्गत कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात गुरुवार दि. 15 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कार्यशाळा होणार आहे.* संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जिल्ह्यातील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) बांधवांना अवगत व्हावी, या उद्देशाने तसेच एम. सी. ई. डी. मार्फत देण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण संबंधी अर्जदार नोंदणी व प्रशिक्षणाची विस्तृत माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) सर्व बांधवानी या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती साधून आपला सामाजिक स्तर उंचवावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रविण जाहीर यांनी केले आहे.000