लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला खिंडार? अशोक चव्हाण यांचा राजीनामा?
काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली तर या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉटरिचेबल आहेत.त्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. दरम्यान अवघ्या काही दिवसात लोकसभा निवडणूक असल्याने अशातच काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
भाजपच्या कार्यालयात काँग्रेस बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसचा बडा नेता म्हणजे अशोक चव्हाण हेच असल्याचे सांगितले जात असून तेच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशाही चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे बडे नेते भाजपच्या मुंबईतील कार्यलयात दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे नेते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
www.konkantoday.com