कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन-कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर


फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन कोकणातील स्थानकांवर थांबणार असून १२ फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रिप असणार आहे. या गाडीच बुकिंग हे फक्त आय.आर.सी.टि. सी. च्या माध्यमातून केल जाणार असून देशभरातून 66 स्थानकांवरून अशा ट्रेन सुटणार आहेत. याच बुकिंग राउंड ट्रिप मधे केल जाणार आहे. लवकरच IRCTC च्या वेबसाईटवर हे बुकिंग उपलब्ध होईल. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या आस्था ट्रेनचा लाभ घ्यावा अस आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केल आहे. त्यांनी नुकतीच कोकण रेल्वेमार्गावरुन अयोध्ये साठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. सदर विशेष ट्रेन कोकण रेल्वेमार्गावरुन सोडल्याबद्दल त्यांनी IRCTC तसेच रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button