शिवसेना पक्ष कार्यालयात आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सकाळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी मारुती मंदिर येथील शिवसेना पक्ष कार्यालयात आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सकाळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शिवसेना पक्ष कार्यालयात श्री सत्यनारायण पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रामुझ शिल्पा सुर्वे ,उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, रत्नागिरी शहर प्रमुख बिपिन बंदरकर, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश रसाळ, माजी नगरसेवक विजय खेडेकर, माजी नगरसेवक विकास पाटील, सुहास भोळे, दिपक पवार, बाळू गांगण, कुवारबावचे प्रकाश साळवी, बबलू कोतवडेकर, अभिजित दुड्ये, सौरभ मलुष्टे, भाऊ देसाई, आशु मोरे, बाबू तळेकर, प्रशांत सुर्वे, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, माजी नगरसेविका वैभवी खेडेकर, योगिता खांडेकर, प्रेरणा विलणकर, श्रद्धा हळदणकर, दिशा साळवी, सुहासिनी भोळे, ऐश्वर्या विचारे, रिया साळवी, शुभांगी पांड्ये, सायली नाखरेकर, पूजा पवार तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com