
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ जुलै पर्यंत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले मनाई आदेश जारी
नारायण राणेंना केंद्रात मिळालेलं मंत्रिपद आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश जारी केलेत. सिंधुदुर्गातील परिस्थिती बिघडू नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37(1) (3) नुसार जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केलेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशातही असे म्हटले आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कलम 37 (1) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखाविली जाण्याची शक्यता असते) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, कलम 37 (3) नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे या कृत्यास मनाई असेल.
www.konkantoday.com