
पुण्यात पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला 21 हजार रुपये किंमत मिळाली
सक्रांतीनंतर हापूस आंबा पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. पुणे बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस दाखल झाला.यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे.
पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला आहे. त्या आंब्याची विधीवत पूजा आज करण्यात आली. यंदा एक महिना आधीच रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे.
www.konkantoday.com