दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. दुचाकी चालवण्याचा दुचाकी स्वार संतोष नारायण घाडी (. हर्चे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात सहदेव राघू घाडी (७० रा. हर्चे) यांचा मृत्यू झाला आहे.२५ जून रोजी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यातील दुचाकी चालक संतोष घाडी हा अॅक्सेस दुचाकी (एमएच-04-ईसी-1548) वर सहदेव घाडी यांना घेऊन निघाला होता. दुचाकी गोळप धोपटवाडी ते सापुचेतळे मार्गे हर्चे ता.लांजा अशी निघाली होती.स्वतः कडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील संतोष घाडी दुचाकी घेवुन जात असताना २५जून रोजी साडेतीनचे दरम्यान नाखरेफाटा या ठिकाणी आले असताना दुचाकीला अपघात झाला.या अपघातात सहदेव घाडी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button