श्री रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात (गाभार्यात) दाखल, सिंहासनावर विराजमान
अयोध्येत मंगळवारी सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या तिसर्या दिवशी, गुरुवारी श्री रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात (गाभार्यात) दाखल झाली असून, सिंहासनावर विराजमान आहे.सोन्याच्या रामयंत्रावर मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
बुधवारीच ही मूर्ती मंदिर संकुलात आणण्यात आली होती. मकरानाच्या पांढर्या संगमरवराने बनवलेले हे सिंहासन गुरुवारी धन्य झाले. मूर्ती 200 किलो वजनाची असल्याने सिंहासनावर बसविण्यास 4 तास लागले. क्रेनच्या मदतीने ती गर्भगृहात आणली गेली होती. तत्पूर्वी, मूर्तीची विशेष पूजा झाली. आता अधिवास विधींतर्गत मूर्ती सुगंधित जलात ठेवण्यात आली असून, रात्रभर रामलल्ला
जलाधिवासात राहतील. नंतर धान्य, फळ आणि तुपात मूर्ती ठेवली जाईल. मूर्ती पूर्णपणे झाकलेली असून, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच आवरण काढले जाईल. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिराचा कळस कापडाने तयार केला जात आहे.
www.konkantoday.com