जुगार अड्डेवाल्यांचा पत्रकारांवर हल्ला, सर्वत्र निषेध जिल्हा पोलीस अधिक्षकांचा कडक कारवाईचा इशारा

चिपळूण ः दारू व मटका धंद्याच्या बातम्या लिहिल्याच्या रागातून खेडमधील काही अवैध धंदेवाल्यांनी बेकायदेशीरपणे जमाव करत दोन पत्रकारांवर भ्याड हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेचा तीव्र निषेध जिल्हाभरातील विविध पत्रकार संघटनांकडून व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी गंभीरपणे दखल घेत सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्ह्यातील मटका व्यावसायिकांवर कारवाई करणार असल्याचे पत्रकारांना आश्‍वासन दिले.
खेड येथे वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या दोन पत्रकारांना मारहाणीची घटना घडली आहे. या जमावाने अचानकपणे खेडमधील एका वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर जमाव करून गोंधळ घालत शिवीगाळ व धमकीच्या बतावण्या केल्या. या जमावाने एवढ्यावरच न थांबता पत्रकार सिद्धेश परशेट्ये व अनुज जोशी यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button