रत्नागिरी जिल्ह्यातील १३ शाळांच्या होणार ३ समूह शाळा
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील १३ शाळांचे ३ समूह शाळांमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने किती मारक आहे, हे आणखी काही वर्षात प्रकर्षाने समोर येणार आहे.
जिल्ह्यातील २० पट पेक्षा कमी असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची माहिती शिक्षण विभागाने संकलित केली होती. त्यामध्ये शेकडो शाळा कमी पटसंख्येच्या असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा हा डोंगराळ असल्याने दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे समूह शाळा केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी एक शाळा म्हणजे समूह शाळा. कमी पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून या शाळेत यावे लागेल.
www.konkantoday.com