
रत्नागिरीत कराेना रुग्ण सापडल्याची अफवा ,सिव्हिल सर्जन यांच्या खुलासा
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे लाखणवाडी येथे दोन करोना व्हायरस संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे मात्र या वृत्तात कोणतेही तथ्य नाही सोशल मीडियात फिरत असलेल्या वृतात ज्या व्यक्तींची नावे आहे असे कोणतेही रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल नाहीत असा स्पष्ट खुलासा सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक बोल्डे यांनी केला आहे केंद्र शासनाच्या आदेशावरून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग तयार करून ठेवण्यात आला रत्नागिरीतही अशा विभाग तयार करण्यात आला असून त्याला सध्या कुलूप आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे
www.konkantoday.com