
पुण्यात अन्न व औषध विभागानं तब्बल 3२ हजार किलो भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केलं
मँगो ज्युसमध्ये केमिकल मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन कसं अॅक्शन मोडवर आलंय ? नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कसा ऐरणीवर आलाय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून…मॅगोपल्प पासूनच ज्युस, जाम.आमरस अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात..मात्र हे मॅगो पल्प केमिकलयुक्त आहे.. पुण्यात सध्या उन्हाळी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध विभागानं तब्बल 3२ हजार किलो भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केलंय.अन्न- औषध विभागाच्या तपासणीअंतर्गत ‘मे. मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम’ या दुकानात अवैधरित्या भेसळयुक्त मँगो पल्प तयार होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.तिथे धाड टाकली असता अनधिकृत रंग आणि इतर पदार्थांचा वापर करून मँगो पल्प तयार केलं जात असल्यांच उघडकीस आलं.या कारवाईत तब्बल 2 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार काही पहिलाच नाहीये. प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई होऊनही हे प्रकार धडधडीतपणे सुरू असतात. याआधीदेखील मुंबईतही 11 हजार लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होत. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातल्या मावळ आणि खेडमध्ये भेसळयुक्त पदार्थ बनवणारं रॅकेट एफडीएनं उद्ध्वस्त केलंय. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांवर सरकार कसा चाप लावणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.




