
राष्ट्रीय सेवा समिती आणि अधिवक्ता परिषद,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन अभिवादन सोहळ्याचे आयोजन
रत्नागिरी: रविवार दि 26 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 ते 7.00 या वेळेत राष्ट्रीय सेवा समिती आणि अधिवक्ता परिषद,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे.या रॅलीचा प्रारंभ रविवार दि 26 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी होईल व समारोप माधवराव मुळ्ये भवन, शेरे नाका,झाडगाव, रत्नागिरी येथे होईल.
रॅलीचा मार्ग भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जिल्हा शासकीय रुग्णालय शेजारी — जयस्तंभ— श्रीराम नका— श्री राधाकृष्ण नाका —गोखले नाका —लक्ष्मी चौक,गाडीतळ ते माधवराव मुळ्ये भवन, शेरे नाका,झाडगाव, रत्नागिरी.असा आहे.
यानंतर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे सभा श्रीमान पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृह, पहिला मजला, माधवराव मुळ्ये भवन, शेरे नाका,झाडगाव, रत्नागिरी. येथे सायं.7.00 वा. संपन्न होईल. संविधान दिन अभिवादन सोहळ्याला अधिवक्ता आशिष बर्वे, प्रभारी प्राचार्य श्रीमान भागोजी शेठ कीर विधि महाविद्यालय रत्नागिरी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
वरील दोन्ही कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन राष्ट्रीय सेवा समिती व अधिवक्ता परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com