वेळणेश्वर येथीलतरुणाला ‘शादी डॉट कॉम’वरील तरुणीकडून तब्बल सोळा लाखापेक्षा जास्त रुपयांचा गंडा
वेळणेश्वर येथील
तरुणाला ‘शादी डॉट कॉम’वरील तरुणीकडून तब्बल सोळा लाखापेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला
आहे.
आपली तब्बल १६ लाख हजार ८६७ रुपयाची
२३ फसवणूक झाल्याची तक्रार गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील एका तरुणाने गुहागर पोलीस स्थानकात केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने ‘शादी डॉट कॉम’ या अॅपवरत्याचे प्रोफाइल तयार केले होते. या अॅपवर अगरवाल नामक आरोपी तरुणीने जाणीवपूर्वक ‘रिक्वेस्ट’ करून ती इंग्लंडमध्ये नोकरीस असल्याचे सांगितले व
फिर्यादी तरुणाचा विश्वास संपादन २५ केला. या विश्वासाच्या जोरावर येण् अन्य एकाच्या मदतीने १७ ऑक्टोबर २०२३ ते १५ नोव्हेंबर २०२३ मुदतीमध्ये ‘ड्यूनक्वॉइन’ मध्ये १६ लाख २३ हजार ८६७ रुपये रक्कम गुंतवणूक करायला लावून या तरुणाची दिशाभूल करत फसवणूक केली. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात संभाव्य आरोपी अग्रवाल हिचे पूर्ण नाव माहित नाही. तिच्याविरोधात भादवि कलम ४१७, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
www.konkantoday.com