
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे”कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात”, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
_मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात आणि शेतकरी कोमात असा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे म्हणाले, “महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा आहे. कारण अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या संपावर आहेत. सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. शासकीय रुग्णालयात डॉक्टर, औषधे आणि उपचाराविना आहेत. यामुळे गेल्या वर्षभरात मृत्यू झाले त्याकडे लक्ष दिले गेले नाही. पण नवीन शासकीय विद्यालय आणि रुग्णालय, नवीन रस्त्यांच्या घोषणा करत आहे. पण पहिल्या योजनांचा पाठपुरवठा कुठेच दिसत नाही. नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाच्या पाठला करायला लावायचे, असे सरकारचे धोरण आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.www.konkantoday.com