खेडमध्ये शिक्षिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

खेड ते आंबवली मार्गावरील कुडोशी गावातील गवळवाडी येथील जि. प. शाळेसमोरील रस्त्यावर दुचाकीवरून पडून सुषमा जयवंत निकम (वय 55) रा. भरणा बाईतवाडी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वार प्रकाश विश्वास काळे (वय 55, रा. भरणे नाका) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काळे हे मोहाने ते भरणा बाईतवाडी या मार्गावर आपल्या ताब्यातील होंडा शाईन दुचाकी (क्र. एमएच 08 ए.व्ही. 0664) ही अविचाराने व हयगयीने चालवून पाठीमागे बसलेल्या सुषमा निकम यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या निकम या मयत झाल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button