रत्नागिरी शहरात नेपाळी वॉचमनची गळफास लावून घेवून आत्महत्या

रत्नागिरी शहरातील जिल्हा परिषदजवळ असलेल्या शंखेश्‍वर प्लाझा या इमारतीत वॉचमनचे काम करणार्‍या हरी भक्ता खडेरा (३२) या नेपाळी वॉचमनने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार ४ तारखेला घडला. यातील हरी याने  दारूच्या नशेत स्वतःच्या डाव्या मनगटावर काचेने जखमा करून घेतल्या तसेच  दारूच्या नशेत ओढणीच्या पट्टीने लोखंडी ग्रीलला एक दोर बांधून दुसर्‍या बाजूला गळफास बांधून बांधावरून उडी मारली. त्यामुळे त्याच्या मानेला फास बसल्याने तो बेशुद्ध झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला ऍम्बुलन्समधून शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button