पदाचा गैरवापर करत कामाच्या बहाण्याने विवाहितेशी शारिरीक संबंध ठेवत ठार मारण्याची धमकी
पदाचा गैरवापर करत कामाच्या बहाण्याने २७ वर्षीय विवाहितेस भरणे येथील एका रिसॉर्टमध्ये आणून तिच्याशी सतत शारिरीक संबंध ठेवत तिच्या कोलकाता येथील राहत्या घरी जावून कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रवीण सुधाकर डोंगरे (५६, रा. भांडूप मुंबई) यास येथील पोलिसांनी अटक केली.
ही घटना २०१९ ते २०२१ या कालावधीत घडल्याचे पिडीत विवाहितेने येथील पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. मुंबई-अंधेरी येथील इंडस्ट्रीयल इस्टेट कंपनीत अटकेतील संशयित एचओडी आहे. महिलेच्या कंपनीत झालेल्या नियुक्तीनंतर १० ते १२ दिवसानी कामाच्या बहाण्याने तिला भरणे येथील एका रिसॉर्टवर आणून तिच्या मनाविरूद्ध शारिरीक संबंध ठेवले. यानंतर २०१९ ते २०२१ या कालावधीतही तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले.
१५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रवीण डोंगरे याने काही व्यक्तीसमवेत पिडीतेच्या कोलकाता येथील राहत्या घरी जावून पोलीस स्थानकात तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी तिच्या कुटुंबियांना दिली. तसेच त्याच्या पत्नीनेही पिडीतेस दमदाटी केल्याचे बंगाल येथील हसनबाद पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते. हा गुन्हा येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला असल्याने कागदपत्रे वर्ग झाल्यानंतर येथील पोलिसांनी प्रवीण डोंगरे यास अटक केली.
www.konkantoday.com