लांजातून वडगावला जाणारी बस अपघातात झाडामुळे वाचली; अन्यथा धरणात उलटली असती

लांजा : लांजाहून वडगावला जाणाऱ्या बसचा बेनी धरणानजीक अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने धरणाच्या पाण्यात जाताना वाचली. मात्र या बसची धडक एका रिक्षाला बसल्याने रिक्षाचालक जखमी झाला आहे. लांजा बसस्थानकातून दुपारी १ वाजता ही बस विद्यार्थी व प्रवासी यांना घेऊन निघाली. स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन आटोपून जवळजवळ २५ ते ३० विद्यार्थी या बसने (एमएच १४ बीटी ३००५) निघाले. त्यात काही अन्य प्रवासीही होते. दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान बेनी येथे बसची रिक्षाला (एमएच ०८ के २५६५) धडक बसली. त्यामुळे एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस साईटपट्टी सोडून शेजारी असलेल्या झाडाला अडकून थांबली. जर गाडी झाडाला अडकून थांबली नसती तर थेट धरणाच्या पाण्यात गेली असती.
गाडी थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी व प्रवाशांना गाडीतून सुरक्षित काढण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button