
चिपळूण बहाद्दूरशेख येथे गटाराला भगदाड
चिपळूण शहरातील बहाद्दूरशेखनाका येथे चिपळूण कराड रोडवर मच्छिमार्केट जवळच्या गटाराला भगदाड पडले आहे. यापूर्वी या गटाराची दुरूस्ती करावी यासाठी काही राजकीय पक्षांनी आवाज उठविला होता, मात्र राष्ट्रीय महामार्ग खाते व संबंधित ठेकेदाराला अद्याप जाग आलेली नाही.
सध्या येथे तीन चार गाड्या अडकून पडल्या होत्या. तर काल रविवारी एक महिलाही पडली होती. तरी याची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहन खरेदी विक्री संघटनेचे सदस्य अशोक पवार यांनी केली आहे. www.konkantoday.com