
ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा निश्चितसरपंचांना १ लाख ७५ हजारापर्यंत तर सदस्यांसाठी ५० हजार मुभा
रत्नागिरी, जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या १४ सार्वत्रिक तर १३४ पोटनिवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम सुरू आहे.उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तत्काळ प्रचाराला सुरवात होते. यासाठी निवडणूक आयोगाने खर्चाचा तपशील ठरवून दिलेला आहे. सरपंचपदाच्या उमेदवारांना ५० हजार ते १ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत तर सदस्यपदाच्या उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करण्यास मुभा आहे.
जिल्ह्यातील १४८ गावात निवडणुकीचा ज्वर सुरू झाला आहे. सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आणि कार्यकत्यांची धामधूम सुरू आहे. कोणतीही निवडणूक असली की, खर्चाचा महापूर सुरू असतो. उमेदवारांनी निवडणूक प्रचारासाठी कितीपर्यंत खर्च करावा यावर निर्बंध घातलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या बंधनापेक्षा अधिक खर्च झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत उमेदवारांच्या खर्चावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नजर ठेवली जाणार आहे. यापूर्वी ७ ते १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रत्येक उमेदवारांना २५ हजार रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करता येत होता. काही वर्षांपासून सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनादेखील निवडणूक खर्चाचे बंधन आयोगाने घातले आहे
www.konkantoday.com