
मरूसागरएक्स्प्रेसच्या डब्याच्या खाली आग ,पेट्रोलमऩने जागृतता दाखवल्याने दुर्घटना टळली
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जयपूरहून एर्नाकुलमला जाणारी मरूसागर एस्प्रेस आडवली स्थानकातून पास होत असतांना त्या ठिकाणी कोकण रेल्वेचे पेट्रोलमन अभय पाटोळे तेथे कार्यरत होते. या धावणाऱ्या गाडीच्या एका बाेगी खालून आग लागल्याचे पाटोळे यांना दिसले त्यानी तातडीने आडवली स्टेशन मास्तर आरती कुमार आणि विलवडे येथील स्टेशन मास्तर अनघा नाटेकर यांना खबर दिली त्यांनी लगेच बेलापूर कंट्रोलशी संपर्क केला आणि वेगाने जाणारी मरूसागर एक्स्प्रेस पुढील विलवडे स्थानकात थांबवण्यात आली इंजिनपासून चौथ्या बाेगीला खालून आग लागली होती रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी ,गार्ड यांनी तातडीने ही आग विझवली.पाटोळे यांनी या प्रकरणी जागृतता दाखवल्याने या गाडीतील प्रवाशांचे संकट टळले याबद्दल पाटोळे यांचे कौतुक करण्यात येत आहे.
www.konkantoday.com