रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अजून युतीतर्फे उमेदवार जाहीर झाला नसला तरी भारतीय जनता पक्षाने मात्र नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित केली असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेला माघार घ्यावी लागणार हे निश्चित आहे या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक होते त्यामुळे या मतदारसंघात अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही असे असले तरी भारतीय जनता पक्षाच्याभारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाच्या महासचिव अरुण सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिल्याचे म्हटले आहे मात्र अद्यापही पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही मात्र आता अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असल्याने ही घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता महायुतीत मतभेद वाढणार की कसे हे आता लवकरच स्पष्ट होईल

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button