
करबुडे-धनावडेवाडी येथील आंबा बागेत आढळला प्रौढाचा मृतदेह
रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे-धनावडेवाडी येथील आंबा बागेत शनिवारी सकाळी 9.30 वा. प्रौढाचा मृतदेह सापडून आला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बबन भिकाजी जाधव (वय 52, रा. बौध्दवाडी करबुडे, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ राजकुमार भिकाजी जाधव (वय 55, राहणार बौध्दवाडी करबुडे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, शनिवारी सकाळी वैभव सदानंद धनावडे यांनी राजकुमार जाधव यांना आंबा बागेत एका प्रौढाचा मृतदेह सापडून आल्याची माहिती दिली व खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार, राजकुमार जाधव यांनी त्याठिकाणी जाऊन तो मृतदेह आपल्या भावाचाच असल्याची खात्री करुन ग्रामीण पोलिसांना खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.