खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर जोड रस्त्यावर कामगारांना घेऊन जाणारी ॲपे रिक्षा उलटली

खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. खेडहून दापोलीच्या दिशेने प्रवासी भरून निघालेली अ‍ॅपे रिक्षा नारंगी पुलाच्या जोड रस्त्यावरून शंभर फूट खोल नारंगी नदीपात्रात कोसळली आहे. हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपे रिक्षामध्ये सर्व परराज्यातील कामगार असल्याची माहिती मिळाली आहे. काम आटपून ते पुन्हा घरी जात असताना हा अपघात झाला आहे. शंभर फूट खोल नदीपात्रात रिक्षा कोसळूनदेखिल दैव बलवत्तर म्हणून कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलींचादेखिल समावेश आहे किरकोळ शारीरिक इजा वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button