जुनी पेन्शन व खासगीकरण धोरण या विरोधात शिक्षक समिती सहकार गट रत्नागिरीमार्फत दापोली तहसीलदार कार्यालय येथे ३ ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक समिती सहकार गटाचे नेते प्रकाश काजवे यांनी दिली.राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मार्च २०२३ मध्ये बेमुदत संप करण्यात आला होता. त्यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे शासनाने मान्य केले होते. मात्र सहा महिने उलटूनही त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. या उलट शासनाकडून खाजगीकरण, कंत्राटी भरती, जिल्हा परिषद शाळा दत्तक देणे, कमी पटाच्या शाळा समूह शाळा नावाने बंद केल्या जात आहेत.
याची सुरुवात पुणे जिल्ह्यात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात याचा खेडोपाड्यातील गोरगरीब पालकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीत लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. पेन्शनचे जनआंदोलन व शिक्षक समिती सहकार गट रत्नागिरी यांच्यामार्फत कै.
भा. वा. शिंपी गुरुजी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ३ ऑक्टोबरला दापोली तहसीलदार कार्यालय येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या कालावधीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या खासगीकरण धोरण या विरोधात शिक्षक समिती सहकार गट रत्नागिरीमार्फत दापोली तहसीलदार कार्यालय...