माळ्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

पोटमाळ्यावरून साफसफाई करीत असताना तोल जावून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली.
मंगला जनार्दन झोरे (५७) या दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे ५ वाजता लवकर उठल्या व घराच्या पोटमाळ्यावर साफसफाई करायला सुरूवात केली. यावेळी त्यांचा अचानक तोल गेला व त्या खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना उपचाराकरिता जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दरम्यान दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ६.३० वा. त्या मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button