दापोली तालुक्यातील केळशी महालक्ष्मी मंदिर परिसर, कुंभारवाड्यात पावसाचे पाणी घरात शिरल्याने येथील स्थानिकांचे लाखो रुपयांचे नुकसान

0
57

दापोली तालुक्यातील केळशी महालक्ष्मी मंदिर परिसर, कुंभारवाड्यात पावसाचे पाणी घरात शिरल्याने येथील स्थानिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू आहे.
केळशी परिसराला आज पहाटेपासूनच वरूणराजाने चांगले झोडपून काढले. यामुळे दरदिवशी असणारी बाजारपेठेतील वर्दळ आज दिसत नव्हती. त्यामुळे आज शुकशुकाट दिसत होता. आज पडलेल्या पावसामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून यामध्ये हळव्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
केळशी परिसरात काल शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर होता. आज पावसाचा जोर कायम राहिल्याने या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे केळशी परिसरात पाणीच पाणी दिसून आले. याचा मोठा फटका महालक्ष्मी मंदिर परिसर व कुंभारवाडा येथील घरांना बसला.
,www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here