
नवीन वर्षात सोन्याला दिवसेंदिवस झळाळी
रत्नागिरी : सोन्याचे दर रत्नागिरीत 57,200 च्या वर पोहोचले आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शुक्रवारपर्यंत सोने दरात तब्बल 2700 रुपयांनी वाढ झाली आहे. सोने दर आता साठ हजाराच्या दिशेने वाटचाल करु लागले आहे. नववर्षात चौदा दिवसात बाराशे रुपयांनी दरवाढ झाली आहे. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत 2700 रुपयांनी सोन्याचे दर वाढले आहेत.