गाड्या वळविल्यामुळे मडगाव येथे अडकलेल्या प्रवाशांना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्याची सोय रेल्वे प्रशासनाने करावी -सचिन वहाळकर यांची मागणी
मध्यरेल्वेच्या पनवेल स्थानका नजिक घसरलेल्या मालगाडी मुळे कोकण रेल्वेमार्गावरील वहातुक विस्कळित झाली असुन काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून मुंबई हून येणाऱ्या जनशताब्दी, नेत्रावती, गोवा संपर्क क्रांती या गाड्या पुणे- मडगाव या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून जे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधील स्थानकांवर उतरणारे प्रवासी आहेत त्यांची मडगाव येथुन आपल्या स्थानकांवर येण्याची व्यवस्था कोकण रेल्वे कडून करावी अशी मागणी
सचिन वहाळकर,सदस्य कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.