
खेड शहरात कचर्यापासून महिन्याला ५ टन खतनिर्मिती
. खेड शहरासह ग्रामीण भागात वाढत्या कचर्याची विशेषतः प्लास्टिकमुक्त कचर्याची समस्या स्थानिक प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात जागेअभावी कचर्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न जटील बनत असतानाच शहरात मात्र विविध प्रभागांमधून दिवसाकाठी ६ ते ७ टन उचलल्या जाणार्या कचर्याचे अपुर्या जागेत व्यवस्थापन होत आहे. न.प.च्या कचरा डेपोत ऑर्गेनिक वेस्ट कंपोस्ट मशिनच्या सहाय्याने ओल्या कचर्यापासून महिन्याला सुमारे ५ टन खतनिर्मिती केली जात असून हे खत ५ रुपये किलो दराने विकलेली जात आहे.www.konkantoday.com