ज्या वस्त्या धोकादायक आहेत. डोंगर, दऱ्या, कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करावे लागेल – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

ज्याला अक्रीत म्हणावं तसं घडतय, अनपेक्षित अशा दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो. त्यामध्ये देखील सगळी धावपळ होते आणि हे जे काय असं अक्रीत घडतं हे बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत. डोंगर, दऱ्या, कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन हे आपल्याला करावंच लागेल. त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने केवळ विचार करणार नाही, तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकणी पुनर्वसन करू.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.तसेच, ज्याचं ज्याचं नुकसान झालं आहे, त्यांना व्यवस्थित नुकसानभरपाई किंवा अन्य बाबींची पुर्तता सरकारतर्फे केल्या जाईल. असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगडमधील महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले. ते दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.
“महाड, चिपळूण, खेड देखील पाण्याखाली गेलं होतं. यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत आणि घडल्या तर त्यामध्ये जीवीतहानी होऊ नये, अशाप्रकारे आपण व्यवस्थापन करत आहोत. केंद्रीय यंत्रणांकडून व्यवस्थित सहकार्य मिळत आहे. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स यांच्याकडून व्यवस्थित मदत मिळत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button