
खेडशीत घरी आलेल्या पाहुण्याने लांबवले मंगळसूत्र
रत्नागिरी : घरी राहण्यासाठी आलेल्या पाहुण्यानेच घरातील सोन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार खेडशी येथे घडला आहे. 45 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबवले. साहिल संजय मटकर (रा. मठ लांजा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात हरिश्चंद्र सखाराम वरेकर (रा. खेडशी, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी साहील मटकर हा वरेकर यांच्या घरी मुक्कामाला होता. दुसर्या दिवशी 23 मार्च रोजी त्याने मंगळसूत्र घेऊन पोबारा केला. याचा तपास पोलिस करत आहेत.