राम मंदिर भूमीपूजना निमित्त रत्नागिरीत भाजपचा आनंदोत्सव

रत्नागिरी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रभू श्रीराम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न साकार होत आहे. या मंदिरासाठी रत्नागिरीकरांनीही योगदान दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी भाजपने आज प्रभू रामचंद्रांना वंदन करत आनंदोत्सव साजरा केला. सकाळपासून रत्नागिरीत विविध ठिकाणी रामरक्षा पठण, श्रीराम प्रतिमेची पूजा करण्यात आली. तसेच आनंदोत्सवानिमित्त लाडू वाटप करण्यात आले.

मारुती मंदिर येथे भाजपच्या वतीने प्रतिमापूजनाचा कार्यक्रम झाला. राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमानजीकी, प्रभू श्रीरामांचा विजय असो अशा विविध घोषणा देण्यात आला. या वेळी शंखनाद आणि आरती करण्यात आली. जय श्रीराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे चिन्ह कमळ लिहिलेले मास्क यावेळी वेगळे आकर्षण असलले मास्कसर्वांनी घातले होते.सोशल डिस्टनसिंग चे भान राखून कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, प्रवीण देसाई, महिला जिल्हाध्यक्ष ऐश्‍वर्या जठार, चिटणीस राजू भाटलेकर, उपाध्यक्ष पिंट्या निवळकर ,मंदिराचे पूजारी जोशी काका,प्राजक्ता रूमडे, नित्यानंद दळवी, प्रशांत डिंगणकर, शहर सरचिटणीस राजन पटवर्धन, मोहन पटवर्धन, मुकुंद जोशी, पमू पाटील, निशांत राजपाल, शिल्पा मराठे, ऋतूजा कुळकर्णी, संजय पुनसकर, शैलेश बेर्डे, नरेंद्र रानडे तसेच युवा मोर्चा, महिला मोर्चा, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button