कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊया – विजय हटकर


   कोकण प्रदेश समृद्ध वनश्रीने नटलेला असून  नद्या, डोंगर,गड-दुर्ग, सुंदर समुद्रकिनारे ,जैवविविधता, रुचकर खाद्यसंस्कृती, वैविध्यपूर्ण संस्कृती ने भरलेला आहे. आगामी दशकात मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्रातील संधी कोकणात उपलब्ध होणार आहेत व याची विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. तसेच सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला कोकणातील निसर्गरम्य लांजा तालुका वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळांनी समृद्ध असून कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊया असे आवाहन कोकण पर्यटन अभ्यासक आणि रत्नसिंधु टुरिझम चे संचालक प्रा. विजय हटकर सर यांनी कल्पना कॉलेज आॅफ हाॅटेल मॅनेजमेंट लांजाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कोकण आणि पर्यटन या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत केले. 

 यावेळी बोलताना प्रा. हटकर सर यांनी कोकणातील सध्याची पर्यटनाची स्थिती, भविष्यातील वाटचाल त्यातील संधी, आव्हाने व  पर्यटन व्यवसाय तसेच लांजा तालुक्यातील वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळांची अभ्यासपूर्ण माहिती दिली.लांजा तालुक्यातील दोनश वर्षापुर्वीच्या कोकणातील गावाची प्रतिकृती असलेले थंड हवेचे ठिकाण माचाळ,जावडे येथील ऐतिहासिक ब्राम्हणी लेणी, रणरागिणी लक्ष्मीबाईचे सासर असलेलर कोटगावातील कातळशिल्पसमुह, ऎतिहासिक- सांस्कृतिक -हरित वनश्रीने परिपुर्ण डेस्टिनेशन

प्रभानवल्ली -खोरंनिनको परिसरातील ऐतिहासिक वारश्याबद्दल माहिती दिली. तसेच कोकणातील आत्मनिर्भर बनु पाहणा-या तरुणाईने नोकरीच्या मागे न धावता स्वतः च्या स्वप्नांवर विश्र्वास ठेवत दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्कता, मेहनतीच्या जोरावर उद्यमशील कल्पनांना बळ द्यावे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा असे आवाहन यावेळी केले.सोबत UNWTO च्या यंदाच्या थीमप्रमाणे हरित शाश्वत कोकण च्या रक्षणासाठी इथल्या लाल मातीवर प्रेम करणा-या प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

२७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्रांतील विविध पर्यटन विकास मंडळे विविध उपक्रम हाती घेत, पर्यटन विकास, सोयी सुविधा, सुलभता या संदर्भात जागृती करीत असतात. यासाठी नवनवीन संकल्पना राबविण्यात येतात यावर्षी पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही संकल्पना राबवित आहेत.या पार्श्र्वभूमीवर कल्पना काॅलेजमध्ये पर्यटन सप्ताहचे आयोजन करण्यात आले अाहे. या पर्यटन सप्ताहचा भाग असलेल्या रांगोळी स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये जागतिक पर्यटन दिन या विषयावर विद्यार्थ्यांनी सुबक रांगोळी काढल्या होत्या.कार्यक्रमाला कल्पना असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश चव्हाण सर, प्राचार्य विकी पवार, प्राध्यापिका धनश्री बंडबे, प्राध्यापिका अंकिता चव्हाण, प्राध्यापिका उर्मिला माजळकर, तसेच सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button