खाजगी बस चालक व रिक्षाचालक यांनी ज्यादा भाडे घेतल्यास नागरिकांनी तक्रार करा-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण

0
56

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने दरपत्रक ठरवून दिले आहे. कोणत्याही खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी.भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही. या दरापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ई-मेल आयडी dyrto.०८-mh@gov.in अथवा ०२३५२-२२९४४४ या व्हॉटस्ॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर ए रिक्षा थांबे व दरपत्रकदेखील ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here