मंत्रालयात धरणग्रस्तांनी वरच्या मजल्यावरून मारल्या उड्या ,पहा व्हिडिओ

0
84

मुंबईत मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी आंदोलन सुरू केले आहे. मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील जाळीवर उड्या मारत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. यातील काही शेतकऱ्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. मंत्रालयात पहिल्या मजल्यावर सुरक्षेसाठी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. अचानक काही शेतकऱ्यांनी या जाळीवर उड्या मारल्या.
अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. आज मंत्रालयात विविध पद्धतीने पास घेऊन ३० ते ४० आंदोलकांनी प्रवेश केला आणि मागण्या संदर्भात घोषणा देण्यास सुरुवात केली. या शेतकऱ्यांचे १९७२ मध्ये धरणासाठी जमीन अधिग्रहन केले होते. मात्र या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही, तसेच स्थानिकांना नोकरी देण्यात आलेले नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू केले होते, आज हे आंदोलन मंत्रालयात केले आहे.
गेल्या १०५ दिवसापासून हे आंदोलन सुरू असल्याचे बोलले जात आहे. आज या शेतकऱ्यांनी मुंबईत मंत्रालयात येऊन आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या. काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर आंदोनावेळी आंदोलकांनी मंत्री दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here