शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची आता क्रिकेटच्या मैदानावर ‘एन्ट्री’

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची आता क्रिकेटच्या मैदानावर ‘एन्ट्री’ झाली आहे. मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्त करण्यात आली आहे.एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला. वानखेडे स्टेडियमच्या आवारात 109 अधिकृत स्वाक्षरी करणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर आणि निलेश भोसले यांची गव्हर्निंग काऊन्सिलवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर बीसीसीआयमध्ये एमसीएचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांची लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button