
रत्नागिरी करानो आता तुम्हाला औषधावर डिस्काउंट मिळणार नाही,रत्नागिरी शहरात डिस्काऊंटशिवाय औषध विक्री करण्याचा औषध दुकानदारांचा एकमुखी निर्णय
रत्नागिरी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रोगराईत वाढ झाल्याने अनेकांना औषधाशिवाय पर्याय नाही त्यामुळे औषधाच्या दुकानात नेहमीच गर्दी दिसत असते रत्नागिरीतील काही दुकानदारांकडून औषधावर ग्राहकांना डिस्काउंट देण्यात येत होता मात्र आता त्यांना यापुढे डिस्काउंट मिळणार नसल्याचे दिसत आहे रत्नागिरी शहरात डिस्काऊंटशिवाय औषध विक्रीचा एकमुखी निर्णय केमिस्ट बांधवांच्या बैठकीत घेण्यात आला आहे
नुकतेच रत्नागिरी तालुका रिटेल केमिस्ट संघटनेची सभा पार पडली रत्नागिरी शहर, पाली, पावस, जाकादेवी, कोतवडे आदी परिसरातील ७५ औषध विक्रेते उपस्थित होते. चर्चेदरम्यान एकमेकांची नावे घेत आम्हालाही डिस्काऊंटवर किरकोळ औषध विक्री करावी लागत असल्याची बाब पुढे आली. डिस्काऊंट देणाऱ्या केमिस्टमुळे संपूर्ण औषध विक्री व्यवसाय धोक्यात आहे. या व्यवसायाच्या प्रश्न निर्माण झाल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी तालुका रिटेल केमिस्ट बांधवांच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित असलेले संघटनेचे पदाधिकारी, विक्रेते.
आदींनी आपापसातील स्पर्धेमुळे रत्नागिरी शहर परिसरातील बांधवांचा व्यवसाय ठप्प झाला हे कठीण परिस्थितीतून मार्ग
काढण्यासाठी डिस्काऊंटवर विक्री करणाऱ्या केमिस्ट बांधवांना तुम्ही खरेदी दरापेक्षा कमी दरात औषध विक्री कशी काय करू शकता अशा सवाल विचारण्यात आला. डिस्काऊंटवर औषध विक्री करण्याबाबत कोणताही निर्णय बैठकीत होऊ शकला नाही तरीही सर्वांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला डिस्काऊंट विक्री करणाऱ्या केमिस्टच्या मालकांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.
औषधांची डिस्काऊंटवर विक्री करू नये असा निर्णय घेऊन बैठकीचा समारोप झाला. जिल्हाध्यक्ष उन्मेश शिंदे, मनोज जोशी, चंद्रशेखर जोशी, बबलू कोतवडेकर, ऐयाज कोण्णूर, राजू आराध्यमठ, गुरूनाथ गराकटे, फिरोज गवाणकर आदींनी बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. बैठकीतील चळवळीमुळे रत्नागिरीतील रिटेल केमिस्टच्या एकतेची जाणीव झाली. परंतु यामुळे ग्राहकांना आता निराश व्हावे लागणार आहे
www.konkantoday.com