स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव ते रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालया ची द्विशताब्दी या कालावधीत वाचक सभासद संख्या 7500 करण्याचा संकल्प:- अँड. दीपक पटवर्धन


हिंदुस्थान च्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना केंद्र शासनाच्या समयोचित हर घर तिरंगा ह्या अभियानात सक्रिय सहभाग घेत असताना द्विशताब्दी नजीक आलेल्या, ग्रंथ समपदेने समृद्ध असलेल्या वाचनालयाची 1600 च्या घरात असलेली वाचक संख्या 7500 पर्यंत वाढवण्याचा संकल्प करीत आहोत.
द्विशताब्दी नजीक आलेली एकमेव संस्था
द्विशताब्दी च्या जवळ आलेली रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय ही रत्नागिरीतील एकमेव संस्था असावी. अनेक आव्हाने ,नैसर्गिक आपत्ती यांचा सामना करत 1828 पासून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे वेगवेगळ्या नावाने ग्रंथ सम्पदा जोपासण्या चे काम करत आहे. रत्नागिरीचे सांस्कृतिक केंद्र म्हणून आपली ओळख वाचनालयांने निर्माण केली.
सुसंस्कृत रत्नागिरी नगरीचा वाचनालय केंद्रबिंदू
रत्नागिरी चा सांस्कृतिक वारसा उन्नत ठेवण्याचे काम वाचनालयाने सातत्याने केले. रत्नागिरीतील अनेक मान्यवर व्यक्तिमत्वानी आपापल्या कारकिर्दीत रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालायला अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.
दुर्मिळ पुस्तकां बरोबर नवीन पुस्तकांचा समृद्ध ठेवा
या भूमीवरील विविध ग्रंथसमपदेने समृद्ध असलेलं हे वाचनालय आहे .वाचकाची वाचनतृष्णा भागवण्यासाठी ओतप्रत भरलेल हे वाचनालय अधिकाधिक वाचकांना सामावून घेण्या साठी उत्सुक आहे. युवा पिढी, बाल वाचक, मध्यमवयीन ,वृद्ध अश्या सर्ववर्गातील स्त्री, पुरुष वाचकांना वाचनालयाचे वाचक सभासद होण्यासाठी आवाहन करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे . या वेळेचं औचित्य साधत वाचनालयाच्या व्यवस्थापक मंडळाने वाचक संख्या 7500 पर्यंत वाढवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना पासून करण्यात येणार आहे.
सुलभ पद्धतीने वाचक सभासद होता येते
वाचनालयाचे वाचक सभासदत्व अगदी सोप्या पद्धतीने प्राप्त करता येते. विहित केलेला अर्ज एक ओळखपत्र रु अनामत रु मासिक फी जमा करून केवळ 15 मिनिटात तुम्ही वाचनालयाचे वाचक सभासद होऊ शकता आणि या मासिक वर्गणीत 2 पुस्तके एका वेळी वाचकाला प्राप्त होतात.
सर्वसमावेशक प्रयत्न करणार
7500 वाचक संख्येच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व शाळा कॉलेज चे विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक वर्ग सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी , रत्नागिरीतील सर्व व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, रत्नागिरीतील विविध संस्था त्यांचे सभासद ,गृहनिर्माण संस्था त्यांचे सभासद ,निवृत्तीधारक त्यांच्या संस्था, विविध कला ,क्रीडा सांस्कृतिक ,सामाजिक विषयांशी निगडित संस्था , ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, बागायतदार या सर्वांना सम्पर्क करून वाचनालयाच्या समृद्ध ग्रंथसमपदेचा आस्वाद घेऊन आपल्या व्यक्तिमत्व विकासाला अधिक संधी प्राप्त करून घेण्यासाठी उद्युक्त करणार आहोत.
युवा वर्ग , विद्यार्थी वर्ग , शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ह्यांना प्रथम टप्यात केंद्रस्थानी ठेवून हे अभियान सुरू करत आहोत .
महाराष्ट्रातील सर्वात जुने मात्र अद्ययावत वाचनालय आपल्या सर्वांना वाचक सभासद होण्यासाठी साद घालत आहे. नव्या जुन्या प्रत्येक विषयावर आधारित उपलब्ध पुस्तक असलेले हे वाचनालय उत्कृष्ट दर्दी वाचकांच्या अव्याहत आगमनाची नेहमीच वाट पहात असते . सर्व नव्या जुन्या वाचकांच्या स्वागता साठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय आतुर आहे. अधिकाधिक सुज्ञ वाचकांनी वाचक सभासद व्हावे असे आवाहन अँड. दीपक पटवर्धन जिल्हा नगर वाचनालायचे अध्यक्ष यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button