
रत्नागिरीतील रिक्षाचालकांनाे सावधान ,खाण्यातून गुंगीचे औषध देऊन रिक्षाचालकांना लुटण्याचे रत्नागिरीत दोन प्रकार
रत्नागिरी शहरात आज दोन रिक्षाचालकांना खाण्याच्या पदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याचा प्रकार घडला आहे आज दिवसभरात असे दोन प्रकार झाल्याचे कळते त्यामुळे एखादी रिक्षाचालकांना लुटणारी टोळी रत्नागिरीत आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सर्व रिक्षाच्या ग्राहकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे
आज सकाळी रत्नागिरी शहरातील एका रिक्षाचालकाला तीनजणांनी गणपतीपुळे येथे जाऊन यायचे आहे असे सांगून रिक्षा भाड्याने घेतली त्यानंतर त्याला खाण्यासाठी प्रसादाचा लाडू दिला त्यामध्ये बहुधा गुंगीचे औषध असावे लाडू खाल्ल्यानंतर रिक्षाचालक बेशुद्ध झाला त्यावेळी रिक्षात बसलेल्या इसमाने रिक्षाचालकाच्या अंगावरील अंगठ्यात चेन वगैरे काढून घेतले सदरच्या रिक्षाचालकाचे नाव किडिये असल्याचे कळते रिक्षाचालक बेशुध्द अवस्थेत परटवणे परिसरात आढळून आला त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान आज सायंकाळी असाच प्रकार चर्मालय परिसरात घडला याही रिक्षाचालकाला खाण्याच्या पदार्थातून गुंगीचे औषध दिले त्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत सोडून त्याच्या अंगावरही दागिने संबंधित चोरट्यांनी काढून घेतले चौगुले असे रिक्षाचालकाचे नाव आहे चर्मालयाचे ऑटोरिक्षा बेशुद्धावस्थेत त्याच्या मित्रांना आढळून आला सदरचा रिक्षाचालकाला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन्ही रिक्षाचालक अजुनही बेशुध्द अवस्थेत असून बोलण्याच्या स्थितीत नाहीत रत्नागिरी दिवसभरात असे दोन प्रकार घडल्याने रिक्षाचालकांना लुटणारी टोळी रत्नागिरीत आली असावी असा अंदाज आहे त्यामुळे आता तमाम रिक्षाचालकानी जागृत व सावधानता बाळगणे गरजेचे आहे अद्याप याबाबत पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे दोन्ही रिक्षा चालक अजुनहीबोलण्याच्या मन स्थितीत नसल्याने नेमकी किती रुपयांची लूट झाली हे अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com