आरटीओ राबवणार आज पासून वाहन तपासणी विशेष मोहीम पण हेल्मेट सक्तीचे काय? नागरिक संभ्रमात

0
35

 उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ कार्यालयामार्फत दिनांक 8 ते 31 मे कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या रस्त्या सुरक्षा समितीने राज्यातील रस्ता सुरक्षा विषय समिती व जिल्हा रस्ता सुरक्षा समिती जिल्हा अंतर्गत येणारे परिवहन विभाग यांच्याशी निगडित उपाय योजने संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येणार आहे या विशेष मोहिमेमध्ये विना  सीटबेल्ट,  विना  वाहनाचा विमा, पियूसी, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, पुरेशा विश्रांती न घेता वाहन चालवणे या बरोबर विना हेल्मेट वाहन चालवणे आदींविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे मात्र रत्नागिरी शहरात पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार हेल्मेट सक्ती  करण्यात आली आहे त्यामुळे गेली काही महिने नागरिक विना हेल्मेट प्रवास करीत आहे आता आरटीओच्या मोहिमेप्रमाणे विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाई करणार असे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले असून जर हेल्मेट वापरले नाही तर आरटीओ मार्फत मोठा दंड आकारला जाणार आहे की काय अशी भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या हेल्मेट संदर्भात संबंधित खात्याने तातडीने खुलासा करणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दंडाला सामोरे जावे लागणार आहे

www.konkantoday.com

WEEKLY SAMANTA
Ratnagiri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here