
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक
रत्नागिरी यंदा पावसाने रत्नागिरी व सिंधुदुर्गवासियांना उत्तम साथ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असल्याची माहिती पाटबंधारे विभाग रत्नागिरी अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी दिली.
कोकणात तुलनेने यंदा मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला. याशिवाय जून महिन्यात पावसाने ओढ दिली तर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र जुलै महिन्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्हे चांगलेच पाणीदार झाले होते. यामुळेच ऐन ऑगस्टमध्ये सरींवर पाऊस बरसत असला तरी गतवर्षीसारखाच पाणीसाठा यंदाही धरणांमध्ये आहे. त्यामुळे एकप्रकारे पावसाने कोकणावर कृपा केली आहे
www.konkantoday.com