पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आमदार राजन साळवी यांच्या विरोधात प्रकल्प विरोधकांची घोषणाबाजी
रिफायनरी प्रकल्प बारसु येथे होण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राला पत्र दिल्यानंतर स्थानिकाना रोजगार या मुद्द्यावर आमदार राजन साळवी यानी उघडपणे प्रकल्पाचे समर्थन सुरु केले होते. स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याने व या भागाचा विकास होणार असल्याच्या मुद्द्यावर साळवी यांनी पाठिंबाची भूमिका घेतली होती तर दुसरीकडे खासदार विनायक राउत हे सातत्याने प्रकल्पाच्या विरोधात होते. मात्र मागील आठवड्यात बारसुचे आंदोलन पेटल्याने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर पुन्हा आमदार राजन साळवी यानी आपली भुमिका बदलली होती. व उद्धव ठाकरे जी जी भूमिका असेल तीच आपली भूमिका असेल असे त्यांनी जाहीर केले होते यानंतर त्यांनी पुन्हा प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली. मात्र त्यांचा सध्याचा विरोध हा दबावातूनच असल्याची चर्चा सुरु आहे.
उद्धव ठाकरेंनी आज, बारसु दौऱ्यावर येत असताना रस्त्यातमध्ये सोलगाव फाट्यावर काही प्रकल्प विरोधकांची भेट घेत चर्चा केली. यावेळी उपस्थित प्रकल्प विरोधकांनी आमदार राजन साळवी यांच्याविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी केली.
www.konkantoday.com