
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण भरले, पाणीपुरवठा होणार सुरळीत
सध्या घडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे कळझोंडी धरण भरले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने त्या परिसरातील पाण्यावर अवलंबून असलेले १४ ग्रामपंचायत अंतर्गत २७ गावातील ग्रामस्थही सुखावले आहेत.या धरणाची उंची वाढवणे, जॅकेट इन करणे, तसेच ग्राऊटींग करणे इत्यादी कामे मागील २ वर्षापासून सुरू होती. त्यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना फेब्रुवारी ते जून २०२४ या ५ महिन्यांच्या कालावधीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिंदल कंपनीकडून पाणीपुरवठा करण्यात आला होता.www.konkantoday.com