भविष्यात ज्युनिअर, सब ज्युनिअर गटातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये रत्नागिरीचे भविष्य उज्ज्वल -डॉ. चंद्रजित जाधव

मैदानावरील खो-खो खेळाडूंचा राबता पाहता भविष्यात ज्युनिअर, सब ज्युनिअर गटातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये रत्नागिरीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी केले.डॉ. जाधव यांच्यासह महाराष्ट्राचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, डॉ. प्रशांत इनामदार, जयांशू पोळ, आंतरराष्ट्रीय पंच नानासाहेब झांबरे, राष्ट्रीय प्रशिक्षक बिपिन पाटील, जगदिश नाणजकर, शरद व्हनखडे, भाऊ कोळी, मंदार कोळी, दलेश देसाई, प्रविण बागल यांच्यासह अन्य पदाधिकारी रत्नागिरी दौर्‍यावर होते.रत्नागिरीतील छ. शिवाजी महाराज क्रीडागंणावरील आर्यन क्लबच्या सराव मैदानावर सर्व पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button