
मॅक्स कंपनीची पॉलिसी पूर्ववत करण्याच्या बहाण्याने ९२ हजार ची ऑनलाईन फसवणूक
चिपळूण शहरातील पाग मळा भागात राहणारे देवेंद्र कदम यांची मॅक्स इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी पूर्ववत करण्याच्या बहाण्याने एका महिलेने त्यांच्याकडून ऑनलाईन ९२ हजार रुपये भरून घेऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे चिपळुन पाग मळा येथील राहणारे देवेंद्र कदम हे कार्यालयात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात महिलेने फोन करून आपण मॅक्स लाइफ इन्शुरन्स मेन ब्रँच मधून बोलत असून फिर्यादी यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या पॉलिसीचा नाव पत्ता जन्मतारीख व प्रीमियम याची माहिती दिली तसेच भरावयाच्या प्रीमियम याची माहिती देऊन एकूण रक्कम एक लाख ९ हजार ७७२ रुपये होत असून तुम्ही एकदम रक्कम भरल्याची रक्कम ९२ हजार ६२२ रुपये होतील असे सांगितले तसेच पाच वर्षाचे मनी बॅग पॉलिसीचे बोनस रक्कम पाच लाख रुपये सुद्धा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले व पैसे भरण्यासाठी त्यांनी एक अकाउंट नंबर सांगितला फिर्यादी याने गुगल पे द्वारे सदर अकाउंटवर ९२ हजार रुपये भरले परंतु समोरून महिलेने कोणतीही रिसीट अथवा बोनसची रक्कम न देता त्यांची फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com