एक कर्मचारी, चार वॉर्ड म्हणजे १०० रुग्ण सांभाळत आहे,वर्ग ४ मधील रिक्त पदे भरण्यात यावीत, अन्यथा १० ऑगस्टला आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून सुरू झाल्यापासून सर्व रुग्णालयीन कर्मचारी रात्रंदिवस राबत आहेत. पण त्यांच्या व्यथा जाणून घ्यायला कोणालाच वेळ नाही. एक कर्मचारी, चार वॉर्ड म्हणजे १०० रुग्ण सांभाळत आहे. त्यामुळे त्वरित वर्ग ४ मधील रिक्त पदे भरण्यात यावीत, अन्यथा १० ऑगस्टला आंदोलन करू, असा इशारा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदनाद्वारे दिला आहे.कोविड 19 मुळे अ‍ॅडमिट व्हायचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच तुटपुंज्या कर्मचार्‍यांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे वॉर्डमध्ये साधा कचरासुद्धा काढला जात नाही, स्वच्छतेच्या नावाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या रोषालाही कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागत आहेनिवेदनाचा विचार झाला नाही तर येत्या१० ऑगस्टला सर्व वर्ग ४ कर्मचारी आंदोलन करतील व याची जबाबदारी प्रशासनावरच राहील. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वासुदेव वाघे, उपाध्यक्ष दिनकर कांबळे, सरचिटणीस विजय जाधव, कोषाध्यक्ष चंद्रशेखर सागवेकर यांनी हे निवेदन दिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button